रंगकर्मी आयोजित नाट्यमहोत्सव

 

नेव्हर माईंड

 

निर्मिती - महाराष्ट्र कल्चरल  सेंटर ,पुणे

दिग्दर्शक - प्रदिप काळे

लेखक- डॉ , विवेक बेळे

संगीत - अक्षय कुलकर्णी

प्रकाश - सिद्धार्थ जोशी/ अपुर्व साठे

कलाकार - अपुर्व साठे/मंदार कुलकर्णी , असीम पाळंदे /आस्ताद काळे ,प्रची मते ,तृप्ती गोसावी

गोषवारा- नेवर माईंड हे नाटक हसत खेळत प्रेमात असणाऱ्यांची मानसिकता उलगडते.निनाद आणि स्मिता दोघेही आजच्या काळातले, सुशिक्षित, आणि महत्वाकांक्षी युवक, प्रेमाच्या वास्तव आणि अवास्तव जगात स्वतःला ओळखू पाहण्यासाठीची त्यांची धडपड या नाटकाद्वारे आपल्यासमोर येते. एकमेकांना आवडत असूनही तसं काही नाही हे दाखण्याचा प्रयत्न, स्वतःहून आपलं प्रेम व्यक्त करण्यापेक्षा समोरच्याकडून ते व्यक्त व्हावे या हट्टापायी प्रेमाचे खेळले एक गमतीशीर राजकारण या नाटकात दाखवले आहे.

निनाद १ आणि स्मिता १ ही निनाद आणि स्मिताची अंतर्मन दोघांबरोबर सतत वावरताना आणि सतत दोघानाही सल्ले देत असतात.त्यांच्याकडून मिळालेल्या सल्ल्यांमुळे परिस्थिती विचित्र आणि गोंधळात टाकणारी होते. आणि प्रेमाच्या गमतीशीर राजकारणाचा खेळ अजूनच रंगत जातो.

 

एकमेकांत

 

निर्मिती - ललित ,मुंबई.

लेखक व दिग्दर्शक - मनस्विनी लता रविंद्र

नेपथ्य - डॉ .प्रवीण भोळे

संगीत व प्रकाशयोजना - विनोद राटोड

कपडेपट - आनंद काळे

कलाकार - केतकी सराफ ,विश्वनाथ बिंड व स्नेहा माजगावकर

गोषवारा - एकमेकात ही एक तुटलेल्या पण न संपणार्‍या नात्याची गोष्ट आहे. पुर्वा ,विशिष्ट विचारसरणीने जगणारी मुलगी आणि स्वप्निल ,प्रवाहाप्रमाणे बदलणारा मुलगा ..पुर्वा अस्वस्थ ,तिच्यात भरलाय असंतोष ,राग जगावरचा.एकीकडे आशावादी आणि दुसरीकडे  प्रत्येक गोष्टीचे विघटन करुन बघण्याची वृत्ती ..त्यमुळे तथाकथित सामाजिक चौकटीत ती बसतच नाही ..पण तीच तीच एक जग आहे ,त्याच्या सोबतच - स्वप्निल च्या सोबतच ...जिथे ती भडभडुन व्यक्त होऊ शकते ..पण ते तुटते ,तिच्या अस्वस्थते मुळे .. कारण त्याला हवी आहे शांतता ,स्थैर्य ,शाश्वती .. हे मिळवण्याचे मार्ग  सोपे आहे कदाचित ..पण ते मिळुन सुद्धा का घोळत आहे पुर्वा स्वप्निल च्या मनात ..? की प्रश्न पडणे पण आहे तितकेच महत्त्वाचे ?हाच आहे का दुवा त्या दोघांमधला ?ज्यामुळे संपलेले नाते रेंगाळत आहे मनात .. घोळतय.. फिरुन परत येतय ..एकमेकात घुटमळतय ..?

 

रस्त्यावरचं गाणं

 

निर्मिती -महाराष्ट्र कल्चरल सेंटर ( ग्रिप्स प्ले)

लेखक व दिग्दर्शक - प्रमोद काळे

संगीत - प्रदिप वैद्य

कलाकार - स्वराली नेर्लेकर ,कुणाल हट्टी , स्वप्नील गोसावी ,हर्षद राजपाठक , सागर राठोड ,प्रवीण निरगुंडे ,  प्रसाद कुलकर्णी ,शुभंकर सातव .

गोषवारा - ररस्त्यावरचं गाणं ,ही कथा आहे धवलची ..धवल ,प्रदिप पानसेंचा मुलगा ,वय वर्षे १२ फक्त .प्रदिप , एक रिमांड होमचा इनचार्ज ,संपुर्णपणे त्या कामाला वाहुन घेतलेला एक पुर्णवेळ कार्यकर्ता ..त्या मुलांना नेहमी मदतीसाठी उपलबद्ध असावे म्हणुन त्याच रिमांड होमच्या कमी दर्जाच्या क्वार्टरस मध्ये राहणारा ..स्वाती ,धवलची आई ,एक " क्लास कॉन्शस स्त्री " जिला हे सगळे मुळीच आवडत नाही . प्रदीप ,अर्थातच त्याच्या स्वभावाला अनुसरुन  रस्त्यावरील मुलांना फक्त ते अनाथ आहेत म्हणुन रिमांड होम मध्ये ठेवण्याचा विरोधात होता आणि हेच त्याने धवल वर बिंबवले होते . धवल सुद्धा एक साधा मुलगा होता आणि ॑वारटर मध्ये राहणार्‍या त्या मुलांशी सुद्धा त्याची सहज मैत्री होत असे .अर्थातच स्वातीला हे मान्य नव्हते .आई बरोबर का बाबा ,या द्वद्वात अडकलेला धवल काही वेगळे करायचे ठरवतो .तो या मुलांबरोबर जगण्याचा खरा खुरा अनुभव घेऊ इच्छित असतो .आणि ,एका ५ मुलांच्या कंपुत जाऊन ,जी धवल हुन वयाने जरा जास्त आहेत पण निष्कलंक आणि खडतर आयुष्य जगत आहेत . आणि ज्यांचा स्वतःवर विश्वास आहे अशा मुलांच्यात जाऊन मिसळतो.

त्या मुलांमधल्या आणि पालकांमधल्या संवादाचा आणि एका नव्या  नात्याच्या जोडणीचा प्रवास म्हणजे रस्त्यावरले गाणे ..

 

अमृत संजीवनी

 

निर्मिती - कलापिनी तळेगाव दाभाडे

संकल्पना .संकलन व दिग्दर्शन- सौ .मीनल कुलकर्णी

संगीत - श्री .विनायक लिमये

नेपथ्य व प्रकाशयोजना - केदार अभ्यंकर

वेशभुषा - सौ वैजयंती दाते

सुत्रधार - सौ ,निरुपा कानिटकर

गोषवरा -अमृत संजीवनी हे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या जीवनावर आधारित दोन अंकी नृत्य नाट्य आहे  ज्ञानदेवांच्या अभंगांवर न्रुत्य रचना व काही नाट्यपुर्ण प्रसंग यांचा सुरेख संगम त्यात घातलेला आहे .या नृत्त नाट्यात ज्ञानेश्वरांची श्ब्दक़ळा हे रुपक वापरलेले आहे . ही शब्दकळा ज्ञानेश्वरांचे विचार ,प्रामुख्याने भावना आपल्या नृत्याविष्कारातुन व्यक्त करते .ज्ञानदेवानी अपल्या अभंगातुन आणि पसायदानातुन सांगितलेला विचार आणि प्रामुख्याने भावना हे स्पष्ट करण्यासाठी यात अनेक रुपके ,समुह रचना आणि आकृती बंध वापरलेले आहेत .व ते अधिक खुलवण्यासाठी अनुकुल पार्शव संगीत आणि प्रकाश योजना यांचा वापर केलेला आहे .जवळ जवळ ४० कलाकारांचा हा संच ज्ञानेश्वरांचा जीवन पट उलघडुन दाखवतो .

 

रंगकर्मी आयोजित नाट्यमहोत्सवाच्या कार्यक्रमाचे वेळापत्रक , परीक्षण - नोंदीप्रायोजक पहा.