
जवळ जवळ ६ महिन्यापुर्वी नाटकाबद्दल काहितरी ठोस करायचे या हेतुने रंगकर्मी .कॉम ची निर्मिती झाली . आणि गेल्या ६ महिन्यात या संकेत स्थळाला उदंड प्रतिसाद लाभला . जगातल्या ३४ देशातल्या प्रचंड मोठ्या जनसमुदायाने या संस्थळाला भेट दिली . नाटकाला खर्या अर्थाने ग्लोबल करण्याचा प्रयत्न झाला . या काळात प्रथितयश कलाकारांच्या मुलाखती , साप्ताहिक साधना च्या दलपतसिंग येती गावा या विशेषांकाचे सह्प्रकाशन असे अनेक उपक्रम आम्ही राबवले . या सगळ्याला चांगला प्रतिसाद मिळाला . पण यामुळे आम्हाला अजुन एक पाऊल पुढे टाकण्याची इच्छा झाली . आणि त्यातुनच नाट्य महोत्सवाची संकल्पना जन्माला आली . कोल्हापुर हे कलापुर ,फार पुर्वीपासुन येथे राजाश्रय आणि लोकाश्रय या जोरावर अनेक कला येथे जोपासल्या गेल्या .त्यातलीच एक महत्वाची कला म्हणजे नाटक . अगदी केशवराव भोसल्यांपासुन ते आताच्या पर्यंत ही कला जोपासली आणि वाढली गेली ,मात्र निरिक्षण केल्यावर असे आढळुन आले की आजकाल या कलापुरीतच नाटकाचा लोकाश्रय कमी होत चालला आहे . रंगभुमी थंडावली आहे . कधी काळी कोल्हापुरातुन असंख्य नाटकांची निर्मिती व्हायची ,आता मात्र ही संख्या हाताच्या बोटावर मोजण्या इतपत ही नसते , हे चित्र बदलण्यासाठी रंगकर्मी ने प्रयत्न करण्याचे ठरवले . आणि यासाठीच काही चांगली नाटके ,जी सहसा कोल्हापुरातील लोकाना पहायला मिलत नाहीत . त्यांचे प्रयोग कोल्हापुरात करायचे ठरवले . ज्यायोगे काही चांगले प्रयोग लोकाना पाहता येतील व स्थानिक रंगकर्मीना ही काही करायची स्फुर्ती मिळेल . व नक्की सध्या काय चालु आहे याचा अंदाज येइल . याशिवाय रंगकर्मींच्या महाराष्ट्र भर पसरलेल्या बेटाना एकत्र आणण्यासही मदत होईल .ज्याचे काही दुरगामी परिणाम होतील . रंगकर्मीने कोणताही व्यावसायिक हेतु न ठेवता हा उपक्रम केलेला आहे . काही चांगले घडावे ही प्रामाणिक इच्छा फक्त पाठिशी आहे . आता आपल्या सहकार्याची गरज आहे . आपण सार्यानी भरभरुन या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा ही विनंती व इच्छा आहे . यानिमित्ताने नाट्य चळवळ पुन्हा वाढीला लागेल व विविध उपक्रमांद्वारे कोल्हापुर पुन्हा कलापुर होण्याकडे वाटचाल करेल असा विश्वास वाटतो ...
नक्की काय आहे हे रंगकर्मी ? रंगकर्मी हे सर्व नाटक करणार्यांसाठी आणि त्यांच्या सुजाण रसिकांसाठी निर्मिलेले संस्थळ आहे. सध्याची माध्यमे नाटक या विषयाला पुर्ण न्याय देण्यास अपुरी पडतात असे बर्याच जणांना वाटते , असेलही कदाचित ..पण आता हे आपले माध्यम या सार्यासाठी उपलबद्ध झालेले आहे ज्याचे मालक तुम्हीच आहात ,तुमच्याच साठी आहे हे सारे … नाटक या विषयावरचे काहीही तुम्ही इथे मांडा …बोला ,बिनधास्त बोला.
यासाठी अनेक विभाग आणि सोयी आपल्याला दिलेल्या आहेत ,त्याचा वापर आपण जरुर करावा अशी इच्च्छा आहे , एक नवा प्रवास आपण सुरु करत आहोत, त्यात नक्की सहभागी व्हा ,सदस्य व्हा आणि जरुर लिहा ,घडामोडी या विभागात आपल्या नाटकांबद्दल, त्यांच्या होणार्या प्रयोगाबदल नक्की माहिती द्या.
थोडक्यात सांगायचे तर विविध सोयींचा अंतर्भाव करुन एक सर्वांगीण संस्थळ बनवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे.या संस्थळाचे लेखक आणि संपादक मंडळही तितकेच तोडीचे आहे हे सांगणे न लगे.मात्र तुमच्या सहभागाशिवाय हे सर्व अपुर्ण आहे,म्हणूनच तुमच्या सहभागासाठी एक विशेष विभाग उपलब्ध केलेला आहे,खरेतर तुमचा सहभाग हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.तुम्ही आम्हाला भरभरुन प्रतिसाद द्याल याची खात्री आहेच.