श्रीमती कविता मच्छिंद्र कांबळी निर्मीत अभिराम भडकमकर लिखित आणि कुमार सोहनी दिग्दर्शित ‘सुखाशी भांडतो आम्ही’ हे सुख म्हणजे नक्की काय ते कसे आणि कुठे शोधावे ह्याचा खरा विचार करायला लावणारे दोन अंकी नाटक पहिले. ‘सुखाशी भांडतो आम्ही’ अशा गुरु ठाकूर ह्यांच्या वजनदार शब्दांच्या गीताने आणि ह्या गीताला लाभलेल्या सुरेश वाडकर ह्यांच्या अप्रतिम सुराने,अशोक पत्कींच्या तालेवार जबरदस्त संगीताने नाटकाची सुरवात होते आणि तिथेच नाटकाची उंची लक्षात येते. मानवाचे स्वता:चे चालना आणि मेंदूला सूचना देणारे मन ,त्याचे अपेक्षीत सुख , सुखाच्या त्यानेच [...]
Continue Reading →2011
अद्वैत २०११”
Media partner – Rangakarmi .com सेठ जी. एस् . वैद्यकीय महाविद्यालय व केईएम् रूग्णालय तर्फे आयोजित खुली व आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा. . “अद्वैत २०११” स्पर्धेचे हे सलग बारावे वर्ष असून डाँ. संजय ओक हे अध्यक्षपद भूषवित आहेत. स्पर्धा आंतरमहाविद्यालयीन व खुली अशा दोन स्वतंत्र गटात घेतली जाणार आहे. प्राथमिक फेरी दि. ६ ते १५ डिसेंबर. स्थळ डाँ. सेन सभागृह, सी.व्ही.टी.सी. इमारत, केईएम रूग्णालय, परळ, मुंबई. अंतिम फेरी दि. १६ डिसेंबर. स्थळ दामोदर हाँल, परळ. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणा-यांनी प्रवेश अर्ज [...]
Continue Reading →माणुस घडवलेली इव्हेंट
काही गोष्टी अशा असतात की तुम्ही कितीही ठरवलं तरी त्यावर लिहीताच येत नाही.. डोक्यात येतं, ”साला, यावर लिहिलं पाहिजें” पण विचारांची आणि पेनाची एकत्र भेट टळत राहते ती कायमचीच.. ” माझी आजी, मी बघितलेलं हॉस्पिटलायजेशन” हे त्यातलेच काही विषय .. पोटातलं ओठावर आणताच येत नाही ,थोडक्यात काय ,तर कीकच बसत नाही .. असाच एक विषय म्हणजे ”नाटय महोत्सव”.. आम्ही केलेला एक इव्हेंट.. म्हटलं तर मोठा बदल वगैरे घडवणारा आणि म्हटल तर कोणालाही काहीही फरक पडत नाही असा फक्त आमचा आमच्यापुरता [...]
Continue Reading →शुभेच्छा !!
टीम रंगकर्मी तर्फे सर्व रंगकर्मी आणि नाट्यरसिकाना जागतीक रंगभुमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !! याशिवाय दिवाळीच्याही हार्दिक शुभेच्छा !! येत्या वर्षात रंगभुमीवर नवनवीन दर्जेदार नाटके येवोत व रंगभुमीची प्रगल्भ वाढ होवो हीच प्रार्थना .. या सर्वात रंगकर्मी .कॉम आपल्या साथीला असेलच .. जागतिक रंगभुमी दिनाच्या निमित्ताने आज आपण आनंद डोह व वा गुरु या दोन दर्जेदार नाटंकाबद्दल लेख प्रकाशित करत आहोत .. या लेखाद्वारे ज्येष्ठ पत्रकार सुभाष इनामदार यांच्या रंगकर्मी वरील सदराची सुरवात होत आहे .. येणार्या काळात श्रीनिवास नार्वेकर यांचे सदर व अनेक दर्जेदार लेख /माहिती [...]
Continue Reading →वा गुरू
चंद्रशेखर फणसळकरांच्या नविन नाटकातली दिलीप प्रभावळकरांची भूमिका पाहल्यानंतर नाट्यरसिकांच्या मनात सहजच एक शब्द घुमतो तो म्हणजे `वा गुरू`. मृत्यूचे भय न बाळगता आयुष्यातल्या जुन्या स्मृतींना जागवत आपल्या मनात सतत असणा-या विचारांना बोलते करणारा हा हाडाचा शिक्षक. पायापासून हळूहळू एकेक अवयव काम न करताना दिवसेंदिवस शरीराने खंगत जातो. ती वेदना हसत हसत झेलताना आयुष्यातल्या अनेक गोष्टी आपल्या एके काळच्या प्रिय विद्यार्थ्याजवळ सांगतात. सगळे नाटकच थोड्याफार फरकाने गंभीर आहे. मूळ ईंगर्जी कथेवरून बेतलेल्या या कथालकातली सारी पात्रे आपले चेहरे घेऊन येतात .अस्सल [...]
Continue Reading →डोह आनंदाचा
“महाराजांवर झालेलं हे लिखाण इतकं विलक्षण आहे, ते तुम्हाला सुचलं कसं?” ”अभंगरचना झाल्यावर तुकारामांना किती आनंद झाला असेल याच्या जाणीवेचं वर्णन तुम्ही त्यांच्या बायकोच्या, आवलीच्या तोंडी दिलंय. आवली नकळत स्वत:च अभंग म्हणते आणि तिला आपला आनंद कुणाला सांगू कुणाला नको असं होतं. त्या भावावस्थेत अवली म्हणते ”मला अभंग पाठ म्हणता आला तर कोणाला किती सांगू असं झालंय…आमच्या बुवाना तर अभंग सुचतात मग त्यांच्या अंगाअंगातून आनंद कसा फुटत असंल..” प्रसंग सादर करताना अगदी तोच आनंदाचा अनुभव..अनुभूती आम्हा श्रोत्यांनाही येते…दर प्रयोगात तीच [...]
Continue Reading →




